अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघात होणार्या मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्र्ण झाली आहे. ही मतमोजणी जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली येथे होत असून संपूर्ण व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी करून आढावा घेतला. त्यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मतमोजणी परिसरात रायगड पोलीस दल, एसआरपी आणि सीआरपीएफ यांचा संयुक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला असून वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनतळासाठी निश्चित केलेल्या ठिकाणीच सर्वांनी आपली वाहने पार्क करावीत, असे आवाहनही भांगे यांनी केले आहे. मतमोजणी केंद्राजवळ मीडिया कक्ष सुरु करण्यात आला असून यामध्ये इंटरनेट, टीव्ही, संगणक, दूरध्वनी आदीबाबींची व्यवस्था करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)
निकालाची प्रतीक्षा
By admin | Updated: May 16, 2014 02:05 IST