डिप्पी वांकाणी - मुंबई
मुंबईतील डीआयजी सुनील पारसकर यांच्याविरोधातील बलात्काराचे आरोप करणा:या मॉडेलने ‘लोकमत’ला दूरध्वनीवरून दिलेल्या मुलाखतीचा सारांश..
तुम्ही ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर आपले मतप्रदर्शन करत आहात?
- मी बलात्कारपीडित असल्याने माझे नाव गुप्त ठेवले गेले आहे. मात्र मी बाहेरच्या जगात सामान्यपणो वावरले पाहिजे. माझी ओळख बाहेर फुटणे मला परवडणारे नाही. त्यामुळे सामान्य बाबींवर मी मतप्रदर्शन करत असते.
ही तक्रार दिल्यानंतर आपल्या आयुष्यात कसे बदल झाले, तुम्हाला काही धमक्या वगैरे येत आहेत का?
- मी सध्या फार त्रसातून जात आहे; पण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. माझ्यावर असलेल्या ताणाविषयी मी सध्या बोलणार नाही. सत्य बाहेर येण्यासाठी तुम्हाला आणखी 10-15 दिवस वाट पाहावी लागेल. माझ्यामागे एक संपूर्ण गट आहे.
पण त्यांचे बिंग लवकरच फुटेल. काही राजकारणी, पत्रकार आणि मॉडेल्स या परिस्थितीचा फायदा घेऊ पाहत आहेत. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालता कामा नये.
‘बिग बॉस’च्या आगामी भागांत सहभागी व्हायचे आहे, अशी चर्चा आहे.
- हे सर्व खोटे आहे. माङया पूर्वीच्या वकिलाने आता विरोधी पक्षाच्या बाजूला जाऊन या अफवा पसरवल्या आहेत. मी आता त्याच्याकडून माझी केस काढून घेतली आहे. मला समजले आहे की तो सतत पारसकरांच्या संपर्कात असतो.
तुम्ही ही घटना घडल्यानंतरही पारसकरांच्या मोबाइल फोनवर एसएमएस पाठवले होते हे खरे आहे का? आपण लाँग ड्राइव्हवर जाऊ या का? वगैरे..
- हे सगळे थोतांड आहे. मी कधीही असे संदेश पाठवलेले नाहीत. माझा फोन फॉरेन्सिक सायंटिफिक लॅबोरेटरीकडे जमा असताना मी असे मेसेजेस् कसे पाठवेन?
मला इतकेच म्हणायचे आहे की, सत्य बाहेर येईर्पयत मला 10-15 दिवसांचा अवधी द्या. सध्या मी याहून अधिक काही सांगू शकत नाही.
तुम्ही लाय डीटेक्टर टेस्टसाठी कशा तयार झालात?
- मॉडेल : या प्रकरणी आरोपी असूनही त्यासाठी तयार नाहीत. पण मला काहीही लपवायचे नाही. त्यामुळे मी तयार आहे. सत्य बाहेर येणे आवश्यक आहे. त्यामुळे मी आपणहून ही टेस्ट करण्यास तयार असल्याच्या कागदपत्रांवर सही केली.