Join us

वायफळ

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST


वांद्रे स्कायवॉक उडवायचाय का?
दुपारची दीड पावणेदानेची वेळ होती. अन्न व औषध प्रशासनात जायचे असल्यामुळे वांद्रे पूर्वेला बाहेर पडले. इतक्यात एका मित्राचा फोन आला, मी वांद्र्याला पोहचतो आहे. एक दहा मिनिटे थांब आपण एकत्रच जाऊया. आता त्याच्यासाठी थांबायचे होते म्हणून वांद्रे स्थानकाच्या बाहेर पडून मी थोडे पुढे जाऊन स्कायवॉकच्या खाली गर्दी कमी होती त्या ठिकाणी जाऊन उभी राहिले. उभ्या उभ्या इकडे तिकडे पाहात असतानाच नजर स्काय वॉककडे गेली. तिथे विशेष काही पाहण्यासारखे नव्हते. पण, माझ्याच विचारात असल्यामुळे मी स्कायवॉककडे पाहात राहिले. पाच एक मिनीटे झाली असतील तितक्यात एक पोलीस शिपाई आला आणि त्यांनी मला हटकले, आणि थेट स्कायवॉक उडवायचा आहे का? असे विचारले.