Join us

वडाळा, अंधेरी पश्चिम मतदारसंघ

By admin | Updated: September 26, 2014 21:40 IST

वडाळ्यात सेना-मनसेमुळे काँग्रेसला फायदा

वडाळ्यात सेना-मनसेमुळे काँग्रेसला फायदा
आघाडी व युती तुटली असली तरी वडाळा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांच्या तोडीचा उमेदवार अन्य कोणत्याही पक्षाकडे नसल्याने काँग्रेसचा येथील बालेकिल्ला राखण्यात कोळंबकर यांना यश मिळण्याची शक्यता आहे़ आघाडी तुटल्याने येथून राष्ट्रवादीकडून जितू म्हात्रे यांचे नाव चर्चेत आहे. शिवसेनेकडून हेमंत डोके, तृष्णा विश्वासराव आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे नाव चर्चेत आहे. भाजपला सध्यातरी उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागत आहे. अवघ्या काही तासांत भाजप कोणाला उभे करणार याची उत्सुकता आहे. मनसेकडून आनंद प्रभू रिंगणात असल्याने येथील लढत चुरशीची आहे.
..............................................
अंधेरी पश्चिममध्ये नाराजीची लढत
अंधेरी पश्चिममधून विद्यमान आमदार अशोक जाधव यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादीमध्ये आधीच नाराजी होती़ त्यात आता भर पडली आहे. राष्ट्रवादीकडून अल्पना पेंटर या रिंगणात आहेत़ पेंटर यांच्याबाबतही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून जयवंत परब यांना उमेदवारी मिळाल्याने सेनेतच नाराजी आहे़ त्यात मनसेकडून रईस लष्करीया यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. लष्करिया यांच्याविरुद्धही बंडखोरी होण्याची शक्यता आहे. भाजपकडून उमेदवार अद्याप जाहीर न झाल्याने तेथे संभ्रमाचे वातावरण आहे़ अंधेरी पश्चिम हा आता नाराजीचा बालेकिल्ला होण्याची शक्यता आहे.