Join us  

सलाम बॉम्बे फाउंडेशनतर्फे मतदान जागृती उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 12:05 AM

प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या स्तरावर जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

मुंबई - प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या स्तरावर जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.  ठाण्यासह मुंबईत ही अश्या कार्यक्रमांनी जोर धरला असून, मुंबईतील सलाम बॉम्बे फाउंडेशन या संस्थेमार्फत शुक्रवारी मतदान जागृतीचा विविधांगी कार्यक्रम पार पडला. यावेळी  स्लोगन मेकिंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या 150 हुन अधिक कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन मतदानाचे महत्व विशद केले.

सलाम बॉम्बे फाउंडेशन ही संस्था 2002 पासून तंबाखू नियंत्रण जागृती हा अभिनव उपक्रम हाती घेऊन सलग 16 वर्ष मुंबईत व मुंबई बाहेरील म.न.पा शाळेत व जिल्हाधिकारी कार्यालयात जनजागृती चे काम यशस्वी रित्या करत आहे.त्याच बरोबर विद्यार्थ्यांना त्यांचे कला कौशल्य सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतुने या संस्थे अंतर्गत मिडीया अकादमी,आर्ट्स अकादमी,स्पोर्ट्स अकादमी,स्किल्स अकादमी अश्या प्रकारच्या अकादमी चालवत आहे. ज्वलंत आणि दैनंदिन विषयांवर विविध प्रकारचे उपक्रम राबवून या संस्थेमार्फत तळागाळातील विद्यार्थ्यांमध्ये विषयाचे महत्व पटवून देण्याचे काम सातत्याने सुरू असते. याअनुषंगाने शुक्रवारी मतदान जागृती कार्यक्रम राबवून आपल्या कर्तव्याची जाणीव लोकांना करून दिले गेल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ज्यांच्याकडे ओळ्खपत्र नाही(वोटिंग कार्ड) किंवा मतदार यादीत नाव नाही अश्यांसाठी संस्था सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :लोकसभा निवडणूकमतदान