Join us  

८३ टक्के कर्मचारी घेणार स्वेच्छानिवृत्ती, बीएसएनएलकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 5:15 AM

मंगळवारी योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. बीएसएनएलच्या राज्यातील १३,६७२ कर्मचाºयांपैकी या योजनेसाठी १०,१८५ कर्मचारी पात्र ठरले होते.

- खलील गिरकरमुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) च्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती योजनेला महाराष्ट्र व मुंबईतून चांगला प्रतिसाद मिळाला. मंगळवारी योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. बीएसएनएलच्या राज्यातील १३,६७२ कर्मचाºयांपैकी या योजनेसाठी १०,१८५ कर्मचारी पात्र ठरले होते. त्यापैकी ८,५४४ म्हणजे ८३.९ टक्के जणांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले. हे प्रमाण एकूण कर्मचाºयांच्या ६२.४९ टक्के आहे.बीएसएनएलच्या मुंबई कॉर्पोरेट कार्यालयातील गट अ मधील ४०, गट ब मधील ११४, क मधील ३७४ तर ड मधील ४८ अश एकूण ५७६ जणांनी अर्ज केले. मुंबई वगळता राज्यात बीएसएनएलचे गट अ मधील ५७६ जणांपैकी ४४९ जण पात्र होते, त्यापैकी ३६७ जणांनी अर्ज केले. ब मधील ३,०१३ जणांपैकी १,१७४ पात्र होते, त्यापैकी ९८४ जणांनी अर्ज केले. क मधील ८,६८० कर्मचाºयांपैकी ७५४१ जण पात्र होते, त्यापैकी ६,५२३ जणांनी अर्ज केले. तर गट ड मधील १,४०३ जणांपैकी १,०२१ पात्र होते, त्यापैकी ६७० जणांनी अर्ज केले.नॅशनल अ‍ॅकॅडमी आॅफ टेलिकॉम फायनान्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट (एनएटीएफएम) च्या १०० टक्के पात्र कर्मचाºयांनी म्हणजे १० पैकी सर्व १० जणांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले. त्यामुळे तेथे आता केवळ ७ कर्मचारी कार्यरत राहातील. महाराष्ट्र ८३.९ टक्क्यांसह दुसºया क्रमांकावर आहे. सर्वात कमी प्रतिसाद टेलिकॉम फॅक्टरी कोलकाता येथे मिळाला. तेथील ४१७ कर्मचाºयांपैकी ३१८ कर्मचारी पात्र होते, त्यापैकी केवळ १४५ जणांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले.बीएसएनएलच्या अ गटातील ७,२११ जणांपैकी ५,६६१ पात्र कर्मचाºयांपैकी ४२९५ जणांनी, ब गटातील ३७ हजार ७८५ कर्मचाºयांपैकी ११,९७१ जण पात्र होते त्यापैकी ९,०१० जणांनी, गट क मध्ये ८६,७५७ जणांपैकी पात्र असलेल्या ७१,००७ पैकी ५४९९४ जणांनी तर गट ड मधील २१,३९० कर्मचाºयांपैकी पात्र १५,३०२ पैकी ९,९३६ जणांनी अर्ज केले.एमटीएनएल मुंबईच्या या योजनेसाठी पात्र ८९२१ कर्मचाºयांपैकी ८,२१० जणांनी म्हणजे तब्बल ९२.०३ टक्के जणांनी अर्ज केले. मुंबई व दिल्लीतील पात्र ठरलेल्या १६,३७० पैकी १४,३८७ जणांनी अर्ज केले आहेत. हे प्रमाण ८७.८९ टक्के आहे.कर्मचाºयांचे दोन दोन महिन्यांचे वेतन प्रलंबित राहत असल्याने तसेच स्वेच्छानिवृत्ती योजनेमध्ये चांगला आर्थिक लाभ मिळत असल्याने योजनेला भरभरून प्रतिसाद दिल्याचे कर्मचाºयांकडून सांगण्यात आले.बीएसएनएलच्या सेवेत केवळ ५,१२८ जण कायमराज्यातील बीएसएनएलच्या एकूण १३६७२ कर्मचाºयांपैकी ८५४४ जणांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केल्याने ते मंजूर झाल्यास बीएसएनएलच्या सेवेत केवळ ५,१२८ जण राहातील. त्यामुळे कामाचा मोठा ताण त्यांच्यावर पडण्याची शक्यता आहे. यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

टॅग्स :बीएसएनएल