मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून उचलबांगडी झालेले डॉ. राजन वेळुकर मंगळवारी सकाळी राज्यपालांची भेट घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशानुसार कुलगुरू पदाचा कार्यभार सांभाळण्याची पुन्हा संधी मिळावी, यासाठी ही भेट होणार असल्याचे समजते.
फेब्रुवारी महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांची पात्रता पुन्हा तपासण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला वेळुकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर वेळुकर यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव
यांची मंगळवारी वेळ मागितली
होती. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}