मुंबई : सर्वाधिक अपघातांची रेल्वे स्थानके आणि प्लॅटफॉर्मच्या उंचीचा मुद्दा समोर ठेवत १५ जणांची संसदीय समिती दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आली आहे. मात्र मंगळवारी पहिल्याच दिवशी या समितीने दिवसभरात एकाच खासदाराच्या मतदारसंघात येणाऱ्या दोन स्थानकांनाच भेट देऊन विश्रांतीचा मार्ग पत्करला. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वाधिक रेल्वे अपघात आणि प्लॅटफॉर्मच्या उंचीचा मुद्दा असणारी स्थानके वेगळीच असून, त्यांच्याकडे ढुंकूनही या समितीकडून पाहण्यात आले नाही. त्यामुळे या समितीने नेमके साध्य केले काय, असा प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनांना पडला आहे.रेल्वे समस्यांचा मुद्दा संसदेत मांडून त्याची माहिती घेण्यासाठी संसद सदस्यांची एक समिती आपल्या शहरात पाठविण्याची याचिका प्रत्येक खासदाराकडून करण्यात येते. त्याप्रमाणे संसदेचे अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार खासदारांची एक समिती त्या शहरात पाठविली जाते. खासदार किरीट सोमय्या यांनी तशी याचिका संसदेत केली होती. त्यानुसार १५ खासदारांची एक समिती रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची आणि रेल्वे अपघातांची माहिती घेण्यासाठी मंगळवारी मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आली. खा. किरीट सोमय्या यांनीच मागणी केल्याने या खासदारांकडून फक्त त्यांच्या मतदारसंघातील स्थानकांचीच पाहणी करण्यात आली. सकाळी अकराच्या सुमारास भांडुप स्थानकात या समितीकडून पाहणी करण्यात आली. या वेळी त्यांच्यासोबत रेल्वे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद, विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही पाहणी २० मिनिटांत झाल्यानंतर तत्काळ घाटकोपर स्थानक गाठण्यात आले. या स्थानकातही १५ मिनिटे पाहणी करण्यात आल्यानंतर समिती सदस्यांसह रेल्वे अधिकारी चर्चगेट येथील मुख्यालयात गेले. त्यानंतर दुपारी पावणेतीनच्या सुमारास या समितीने काही मोजक्याच प्रवासी संघटनांची भेट घेऊन पहिला दिवस त्वरित आटोपता घेतला. मुळात एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार आल्यानंतर फक्त दोन स्थानकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल प्रवासी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)या समितीने मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक अपघातांच्या तसेच समस्या असलेल्या स्थानकांना भेट न देणे तसेच याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनीही त्यांना न देणे प्रवाशांच्या दृष्टीने कितपत योग्य आहे. जरी एका भाजपा खासदाराने त्यांना आपल्या विभागापुरते बोलावले असले तरी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने अन्य स्थानकांचा आढावाही घेणे आवश्यक होते. - सुभाष गुप्ता, रेल्वे यात्री संघ, अध्यक्षच्या समितीची बुधवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनासोबत बैठक होणार आहे. मंगळवारी प्रवासी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत प्लॅटफॉर्मची उंची आणि रेल्वे अपघातांना आळा घालण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न यावर चर्चा झाली. च्या समितीची बुधवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनासोबत बैठक होणार आहे. मंगळवारी प्रवासी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत प्लॅटफॉर्मची उंची, सरकते जिने, महिला सुरक्षा, पादचारी पुल, स्वयंचलित दरवाजा लोकल यावर चर्चा झाली. या वेळी हार्बरवरील बहुतांश प्लॅटफॉर्म कमी उंचीचे असल्याचे प्रवासी संघटनांकडून लक्ष वेधण्यात आले. मध्य व पश्चिम रेल्वेवरीलही काही स्थानकांमध्ये हा प्रश्न असल्याचे सांगितले.
अपघातांची स्थानके सोडून भलत्याच स्थानकांना भेट
By admin | Updated: May 20, 2015 02:06 IST