मुंबई : मुंबई सेंट्रल येथील खासगी रुग्णालयात ४७ वर्षीय महिला उपचारांसाठी दाखल झाली होती. ७ सप्टेंबरला डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले. त्यानंतर डॉक्टरांनी अवयदानाचे महत्त्व कुटुंबीयांना पटवून दिले. समुपदेशनाअंती कुटुंबीयांनी अवयवदानाला परवानगी दिली.शुक्रवारी या महिलेची दोन मूत्रपिंडे, यकृत आणि डोळे हे अवयव दान करण्यात आल्याची माहिती मुंबई सेंट्रल येथील खासगी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पराग रिंदानी यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी पार पडलेले मुंबईतील हे ३५वे अवयवदान आहे. माहिम येथील खासगी रुग्णालयात हे अवयवदान करण्यात आले.
महिलेच्या अवयवदानाने एकाला दृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 06:23 IST