पालघर/वसई/ विक्रमगड/वाडा : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झालेले विक्रमगडचे आमदार विष्णू सवरा यांना वजनदार खाते देण्याची मागणी पालघर आणि ठाण्यातील भाजपा नेते आणि कार्यकत्र्यानी केली असून ती पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
आदिवासी आमदार अन्य कोणते खाते सांभाळू शकत नाही काय? मग, आदिवासी आमदाराच्या माथी आदिवासी कल्याण अथवा समाज कल्याण हीच खाती का मारली जातात, असा सवालही या मंडळींनी केला आहे. पालघर हा नवीन जिल्हा आहे. सागरी, नागरी आणि डोंगरी अशा तीन स्वरूपाचे त्याचे प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी त्या भागाचे प्रतिनिधित्व करणा:या आमदाराला ग्रामीण विकास, महसूल, मत्स्योद्योग विकास, शिक्षण अशी खाती का दिली जात नाहीत, असा प्रश्न येथील कार्यकत्र्याचा आहे. सवरांच्या आदिवासी पाश्र्वभूमीपेक्षा त्यांच्या आमदारकीचा 3क् वर्षाचा विधानसभा कार्याचा असलेला अनुभव याला जास्त महत्त्व दिले पाहिजे, असे या मंडळींचे म्हणणो आहे. महसूल, गृह, अर्थ ही खाती मातब्बर नेत्यांनी पटकाविल्यानंतर उरलेल्या महत्त्वाच्या खात्यांपैकी एखादे तरी सवरांच्या वाटय़ाला यावे, अशी भाजपाच्याच कार्यकत्र्याची आणि या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांची इच्छा आहे. आदिवासी विकास खात्याला जर आदिवासी नसलेला मंत्री चालू शकतो, तर अन्य खात्यांना आदिवासी मंत्री का चालू शकत नाही, असा सवालही या मंडळींनी केला आहे. (विशेष प्रतिनिधी)
कॅबिनेट मंत्रीपद मिळवून विष्णू सवरा यांनी वसंतदादा पाटील मंत्रिमंडळात गृहनिर्माणमंत्री झालेल्या ताराबाई वर्तकांची परंपरा चालविली आहे. वसई त्या वेळी ठाणो जिल्ह्यामध्ये होते. परंतु, या आदिवासी ग्रामीण पट्टय़ात त्यांच्या रूपाने प्रथमच कॅबिनेट मंत्रीपद लाभले होते.
त्यानंतर, मनीषा निमकर, शंकर नम, राजेंद्र गावित अशी तीन राज्यमंत्रीपदे पालघर, डहाणू या मतदारसंघांना लाभलीत. परंतु, ती राज्यमंत्रीपदे होती. नारायण राणो यांच्या मंत्रिमंडळात सवरा हे मंत्री होते. परंतु, त्यांचेही पद राज्यमंत्री असेच होते. परंतु, पालघर हा नवा जिल्हा झाल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यांच्या काळात त्याला कॅबिनेट मंत्रीपदाचा लाभ झाला आहे, हे विशेष.
या नव्या जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाची परंपरा सवरांनी निर्माण केली आणि एका परीने ताराबाई वर्तक यांची परंपराच पुढे चालविली आहे. आता या परिसराला मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्ष असलेल्या बविआच्या कोणत्या आमदाराला कोणते मंत्रीपद मिळते, याची प्रतीक्षा आहे.