Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट होणार मुंबईकर, वरळीत ३४ कोटींचा फ्लॅट

By admin | Updated: June 17, 2016 20:46 IST

भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहलीने वरळीमधील एका आलिशान इमारतीमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. विराटने यासाठी तब्बल ३४ कोटी रुपये खर्च करुन हा आलिशान फ्लॅट खरेदी केला असल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १७ : भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहलीने वरळीमधील एका आलिशान इमारतीमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. विराटने यासाठी तब्बल ३४ कोटी रुपये खर्च करून हा आलिशान फ्लॅट खरेदी केल्याचं वृत्त आहे.

इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, वरळीतील ओंकार रिलेटर अँड डेव्हलपर्सद्वारा बनविलेल्या प्रोजेक्टमधील ३५ व्या मजल्यावर विराटने फ्लॅट खरेदी केला आहे. विराटचा फ्लॅट ओपन स्काय बंगलो असून, हा फ्लॅट तब्बल ७ हजार स्क्वेअर फुटांचा आहे. क्रिकेटर युवराज सिंग यानेसुद्धा याच टॉवरमध्ये २९व्या मजल्यावर फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटच्या खरेदीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, आता अखेर खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असून, विराटने हा फ्लॅट खरेदी केला आहे.

यासोबतच रोहित शर्माने रितीकासोबत विवाह झाल्यानंतर वरळीमध्ये ४ बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. अहुजा टॉवरमधील हा फ्लॅट रोहित शर्मा याने ३० कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. रोहित शर्माच्या फ्लॅटमधून वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई शहराचा नजारा पाहायला मिळतो.