Join us

विरार येथे आगाराचे भूमीपूजन

By admin | Updated: June 30, 2015 22:46 IST

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेकरीता बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत आगाराचे भूमीपूजन मंगळवारी महापौर प्रविणा ठाकूर व नालासोपाऱ्याचे आ. क्षितीज ठाकूर

वसई : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेकरीता बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत आगाराचे भूमीपूजन मंगळवारी महापौर प्रविणा ठाकूर व नालासोपाऱ्याचे आ. क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते यशवंतनगर येथे पार पडले. यावेळी माजी महापौर राजीव पाटील व उपमहापौर उमेश नाईक इ. मान्यवर उपस्थित होते.वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेकडे आगार नसल्यामुळे परिवहन सेवेच्या बसेसना रस्त्यावरच उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास व वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महानगरपालिकेने विरार शहरातील यशवंत नगर येथे अद्ययावत आगार उभारण्याचा निर्णय घेतला. या कामास लवकरच सुरूवात होणार आहे. कोट्यावधी रू. खर्चून उभे राहणारे हे अद्ययावत आगार हे प्रवाशांसाठी सोयीचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)