Join us

विरारमध्ये शाळकरी मुलीवर चाकूहल्ला

By admin | Updated: July 21, 2015 09:09 IST

शाळेत जाण्यास निघालेल्या दहावीतील विद्यार्थिनीवर एका तरुणाने चाकूहल्ला केल्याची घटना विरार पूर्वेस घडली. ती राहत असलेल्या इमारतीत

वसई : शाळेत जाण्यास निघालेल्या दहावीतील विद्यार्थिनीवर एका तरुणाने चाकूहल्ला केल्याची घटना विरार पूर्वेस घडली. ती राहत असलेल्या इमारतीत घुसूत तरुणाने तिच्या पोटात सुरा खुपसला. तिच्यावर विरार येथील संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरार पूर्वेस ‘साई सावली’ इमारतीत राहणारी मानसी घाणेकर ही मुलगी सकाळी शाळेत जाण्यास इमारतीमधून खाली उतरत असतानाच हल्लेखोर तरुण तोंडाला रुमाल बांधून उभा होता. त्याने तिच्या पोटामध्ये सुरा खुपसला. ती रक्तबंबाळ अवस्थेतच घरी परतली. आईला घडलेला प्रकार समजताच तिने तत्काळ रुग्णालयात दाखल केले. काही दिवसांपूर्वी एका मुलाने तिच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी तिने त्यास जोरदार विरोध केला होता. त्याच मुलाने हा हल्ला केला असावा, असा संशय पोलिसांना आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला. त्याच्या मोटारसायकलच्या नंबरवरून पोलीस शोध घेत आहेत.