Join us

नियमांचे उल्लंघन; चार हॉटेलवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:06 IST

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार हॉटेलवर मुंबई पोलिसांनी शनिवारी (दि. ...

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार हॉटेलवर मुंबई पोलिसांनी शनिवारी (दि. ३) करवाई केली. यात उत्तर विभागातील दोन, दक्षिण आणि मध्य मुंबईत प्रत्येकी एक हाॅटेल आहे. आतापर्यंत अशी हॉटेल तसेच विविध आस्थापनांविरुद्ध ३८४ गुन्हे नोंद आहेत.

.............................................

टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मुंबई : मुंबई सेंट्रल सिग्नल परिसरात भरधाव पाण्याचा टँकरच्या धडकेत दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकी चालक राशिदा अब्दुल रशीद सय्यद (वय ४०) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करीत अधिक तपास सुरू केला आहे.

....................................

विदेशात नोकरीचे आमिष दाखवून गंडा

मुंबई : विदेशात नोकरीचे मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन ठगांनी घाटकोपरमधील एका व्यक्तीची पावणे दोन लाखांना फसवणूक केली. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी शनिवारी (दि. ३) गुन्हा नोंद केला. ऑगस्ट ते डिसेंबर २०१९ या काळात ही फसवणूक करण्यात आली असून, घाटकोपर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

..........................