Join us
Daily Top 2Weekly Top 5

विनोद तावडे, राज ठाकरेंची ‘कृष्णकुंज’वर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:36 IST

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी महराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. अचानकपणे झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मुंबई : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी महराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. अचानकपणे झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. चर्चेचे कारण गुलदस्त्यात असल्याने दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशीलही बाहेर आलेला नाही. अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या निमंत्रणासाठी ही भेट असल्याचे तावडे यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याने राजकीय चर्चा जोरात रंगल्या आहेत. आगामी काळात विधान परिषद निवडणुकांच्या काही जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील काही जागा या मुंबई परिसरातील असतील. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

टॅग्स :राज ठाकरे