Join us

नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 04:44 IST

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपद सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे भूषविणार आहेत.

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपद सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे भूषविणार आहेत. नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन, संमेलनाचे स्वागताध्यक्षपद त्यांनी स्वीकारावे, अशी त्यांना विनंती केली होती. मुंबईत होत असलेल्या या संमेलनाला राज्यभरातील रसिकांनी उदंड प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले आहे.दरम्यान, संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांचा नाट्यपरिषदेतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलातील नाट्यपरिषदेच्या कार्यालयात एका छोटेखानी सोहळ्यात सत्कार करण्यात आला. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासह नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीचे, तसेच नियामक मंडळाचे सदस्य या वेळी उपस्थित होते.