Join us
Daily Top 2Weekly Top 5

चतुरंग प्रतिष्ठानचे विनायक काळे कालवश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:06 IST

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंंबई : सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेल्या चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक काळे यांचे शुक्रवारी गिरगाव ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंंबई : सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेल्या चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक काळे यांचे शुक्रवारी गिरगाव येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

चतुरंग प्रतिष्ठानच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनात गेली तब्बल चार दशके त्यांनी त्यांचा वेगळा ठसा उमटवला होता. चतुरंगच्या रंगसंमेलनांची धुरा त्यांनी अथकपणे वाहिली. चतुरंगच्या सर्व कार्यक्रमांच्या प्रसिद्धीची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. त्यामुळे सर्वच माध्यमांशी त्यांचा सतत संपर्क असायचा. त्यांच्या निधनाने चतुरंगने महत्त्वाचा कार्यकर्ता गमावला असल्याची भावना चतुरंग प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक क्षेत्रात व्यक्त होत आहे.

विनायक काळे यांच्या निधनाने चतुरंगचा सच्चा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला असून, चतुरंगचा आधारस्तंभ हरपला असल्याची भावना चतुरंगचे प्रमुख कार्यकर्ते विद्याधर निमकर यांनी व्यक्त केली.

...........................