Join us
Daily Top 2Weekly Top 5

विक्रोळी येथील विवाहितेची हत्या प्रियकराकडून?

By admin | Updated: June 20, 2014 01:55 IST

फरारी आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे.

मुंबई : विक्रोळी येथील बंद खोलीत सापडलेल्या अर्चना ओमप्रकाश ठाकूर (3क्) या विवाहितेची हत्या या खोलीत राहत असलेल्या रोहित यादव या सुरक्षारक्षकाने प्रेमसंबंधातून केल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, फरारी आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे.     
पतीसोबत झालेल्या भांडणानंतर आठ महिन्यांपूर्वी बिहार येथून विक्रोळी येथील सूर्यानगर येथे माहेरी परतलेली अर्चना गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता होती. तिचा शोध सुरू असताना शनिवारी सकाळी नुरानी मशिदीजवळील एका बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेतील तिचा मृतदेह पोलिसांना सापडला. शवविच्छेदन अहवालानंतर अर्चनाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. (प्रतिनिधी)
 
च्मृतदेह सापडलेल्या खोलीच्या घरमालकाकडे केलेल्या चौकशीत या खोलीत रोहित यादव हा भाडेकरू राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रोहित दोन महिन्यांपूर्वीच खोली सोडून गावी गेला होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपला एक सुरक्षारक्षक मित्र याच खोलीत राहत असल्याचे पोलिसांना सांगितले.
च्राहुलच्या या मित्रचे अर्चनासोबत प्रेमसंबंध होते. अर्चना त्याला भेटण्यासाठी याच खोलीवर येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अर्चनाचा मृतदेह या खोलीत सापडल्याने रोहितच्या सुरक्षारक्षक मित्रनेच तिची हत्या केल्याचा संशय होता.