Join us

विजय चौगुलेंचा कोपरखैरणेत प्रचार

By admin | Updated: October 13, 2014 02:17 IST

ऐरोली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले यांनी आज वाशी येथील एमजीएम कॉम्प्लेक्स आणि कोपरखैरणे परिसरात प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधला

ऐरोली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले यांनी आज वाशी येथील एमजीएम कॉम्प्लेक्स आणि कोपरखैरणे परिसरात प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या प्रचार दौऱ्याला दोन्ही विभागातील रहिवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.उद्या प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. यातच आज रविवार असल्याने चौगुले यांनी शेवटच्या टप्प्यात मतदार संघ पिंजून काढला. वाशी विभागातील एमजीएम कॉम्प्लेक्स आणि जुहूगाव परिसरात भव्य रॅली काढून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी कोपरखैरणे परिसरात रॅली काढून आपले शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत मोटरसायकल्स, चारचाकी वाहनांसह शिवसैनिकांचा मोठा ताफा पहावयास मिळाला. विशेषत: महिला कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. युवा वर्गाचा सहभागही तितकाच लक्षणीय असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)