Join us
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीशी लगट करणा-या विद्यार्थ्याला मारहाण करून व्हिडिओ केला अपलोड

By admin | Updated: November 25, 2014 09:43 IST

महाविद्यालयातील तरुणीशी मैत्री करणे एका विद्यार्थ्याचे तरुणीच्या मित्राने अपहरण करून त्याच्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला आहे.

मुंबई : महाविद्यालयातील तरुणीशी मैत्री करणे एका विद्यार्थ्याला चांगलेच महागात पडले. या तरुणीच्या मित्राने  दोन साथीदारांसह या विद्यार्थ्याचे अपहरण केले. बेदम मारहाण केली आणि या मारहाणीची व्हीडीओ क्लीप काढून ती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. ही क्लीप फिरून-फिरून विद्यार्थ्याच्ा नातेवाइकांनी पाहिली आणि हा प्रकार उघड झाला.
या प्रकरणी अंबोली पोलिसांनी हॅरीश फैजानुल्ला खान, आदम अली आणि रियाझ अन्सारी या तिघांना गजाआड केले. या गुन्ह्यात हॅरीश मुख्य आरोपी आहे. दरम्यान, पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले तेव्हा हॅरीशने आपले वडील निवृत्त आयएएस असल्याचा दावा करून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रय} केला. वांद्रे येथील एका महाविद्यालयात बीएमएएसच्या पहिल्या वर्षाचा अभ्यास करणा:या आयुष पांचाळ या विद्याथ्र्याचे हॅरीशने अपहरण केले. चौकशीत याच महाविद्यालयात बारावीत शिकणा:या विद्यार्थिनीशी आयुषने मैत्री केली होती. ही मैत्री हॅरीशला खटके.  हॅरीश या विद्यार्थिनीला आठवीपासून ओळखत होता. त्यातच आयुषची लगट या विद्यार्थिनीलाही खटकू लागली. तेव्हा  विद्यार्थिनीने आयुषची तक्रार हॅरीशकडे केली. तेव्हा हॅरीशने आपल्या मोठय़ा भावाच्या कार्यालयात काम करणा:या आदम व अन्सारी या दोघांना सोबत घेऊन 15 नोव्हेंबरला आयुषचे अंधेरीतल्या सीटी मॉलजवळून अपहरण केले. तिघांनी आयुषला सांताक्रुजच्या चिरानगर, वांद्रे कार्टररोड असे दोन तास फिरवले. या प्रवासात हॅरीशच्या सांगण्यावरून आदम व अन्सारीने आयुषला बेदम मारहाण केली.  (प्रतिनिधी)
 
मारहाणीचे शूटिंग
हॅरीशच्या सांगण्यावरून आदम व अन्सारीने आयुषला बेदम मारहाण केली. या मारहाणीचे शूटिंगही केले. अखेर कार्टररोड येथे गाडीतून उतरवून हे तिघे पसार झाले. जाण्याआधी या प्रकाराची वाच्यता केलीस तर ठार मारू अशी धमकीही दिली. त्यामुळे आयुषने इतके दिवस हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.