Join us

VIDEO - काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळलं दिग्दर्शक मधुर भंडारकर यांचं पोस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 18:43 IST

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 24 - इंदू सरकार या आगामी चित्रपटामध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व त्यांचे पुत्र संजय ...

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 24 - इंदू सरकार या आगामी चित्रपटामध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व त्यांचे पुत्र संजय गांधी व इतर ज्येष्ठ काँग्रेस नेतेमंडळींचे नकारात्मक प्रस्तुतीकरण केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिग्दर्शक मधुर भंडारकर व इंदू सरकारच्या प्रतिमेचे दहन केले.
 
“सदर चित्रपट आपल्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करणाऱ्या थिएटरमध्ये देखील काँग्रेस कार्यकर्ते असेच विरोध प्रदर्शन करून शो बंद पाडतील  त्यामुळे सिनेमागृहाच्या मालकांनी सदर चित्रपट आपल्या थिएटरमध्ये चालवू नये”, असे आवाहन यावेळी प्रदर्शनाचे नेतृत्व करणारे, राजेश इंगळे यांनी केले.

https://www.dailymotion.com/video/x8458xb