Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: अनवाणी धावणा-या मिलिंद सोमणला मिळाली आईची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 13:42 IST

अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणला 'द ग्रेट इंडिया रन' मॅरेथॉनमध्ये त्याची आई उषा सोमण यांची साथ मिळाली

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 04 - अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणने नुकतच 'द ग्रेट इंडिया रन'च्या माध्यमातून अहमदाबाद ते मुंबई असं एकूण 527 किमी अंतर पुर्ण केलं. विशेष म्हणजे मिलिंद सोमणने अनवाणी हे अंतर पार केले. मात्र यामधील सर्वात लक्षवेधक दिवस ठरला जेव्हा मिलिंद सोमणला धावण्यात त्याची आई उषा सोमण यांची साथ मिळाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उषा सोमण यांचं वय 78 असूनदेखील त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
 
मिलिंद सोमणने आपल्या आईसोबत धावतानाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. महाराष्ट्रातील मनोर येथे पोहोचले असताना उषा सोमण यांनी मिलिंद सोमणला साथ दिली. 78 हा फक्त आपल्यासाठी एक आकडा असल्याचं उषा सोमण यांनी सिद्ध केलं आहे. उषा सोमण यांनी याआधीही 100 किमी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. 
 
पहिल्याच दिवशी म्हणजे 26 जुलै रोजी मिलिंदने अहमदाबाद ते आणंद हे 67 किलोमीटरचे अंतर अनवाणी पार केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही 62 किलोमीटरचे अंतर पार केलं होतं. मिलिंद सोमण मुंबईत पोहोचला असून गेट वे ऑफ इंडियाला पोहोचल्यानंतर हे अंतर पुर्ण होणार आहे.