Join us  

Video : मुंबईत भेटणार तर मराठीतच बोलायंच, हार्दीक पांड्या मराठी बोलतो तेव्हा...

By महेश गलांडे | Published: December 11, 2020 10:32 AM

मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कसं काय, हार्दीक भाऊ? अशी टॅगलाईन देत हार्दीक पांड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दीक चक्क मराठीत बोलताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देमुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कसं काय, हार्दीक भाऊ? अशी टॅगलाईन देत हार्दीक पांड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दीक चक्क मराठीत बोलताना दिसून येत आहे.

मुंबई - महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलंच पाहिजे, असं प्रत्येक मराठी माणसाला वाटतं. मुंबईतील प्रमुख पक्ष असलेल्या मनसे आणि शिवसेनेनं अनेकदा मराठीचा मुद्दा उचलला आहे. परराज्यातून आलेल्या नागरिकांना मराठी संस्कृती आणि भाषा शिकायला भाग पाडलंय. आता, टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दीक पांड्यानंही मुंबईत राहणाऱ्यांना मराठीतच बोललं पाहिजे असं सांगितलंय. मी मराठी शिकलो असून मुंबईत राहणाऱ्यांनीही मराठीत आपल्या गोष्टी केल्या पाहिजेत, असे हार्दीकने म्हटले आहे. 

मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कसं काय, हार्दीक भाऊ? अशी टॅगलाईन देत हार्दीक पांड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दीक चक्क मराठीत बोलताना दिसून येत आहे. काय म्हणताय, सगळं बरं का?  नाय नाय आमची मुंबई खूप खूप छान, ये कसा काय पुछतो .. तू सांग कसा काय ते... सगळ बरं आहे, इथं धूप खूप हाय. गर्मी तर अहा.. काय सांगू तुम्हाला. मी मराठी शिकणार आता, बॉम्बेमध्ये कोई भी मिलना तो मराठीत गोष्टी करा आता, सगळं येतं मला. करतो पण आता आणि प्रॅक्टीसपण इथंच चाललीय, असे संवाद हार्दीकने मराठीत म्हटले आहेत. हार्दीकचा हा व्हिडिओ नेटीझन्सला चांगलाच आवडला आहे. 

मला माझ्या बाळाला घबायचं आहे

मर्यादित षटकांच्या मालिकेत शानदार कामगिरी केल्यानंतर आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात थांबण्याच्या आशा उंचावल्याच्या दोन दिवसानंतर भारताचा आक्रमक अष्टपैलू हार्दिक पांड्याने मायदेशी परतत आहे. पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या पांड्याने अद्याप नियमित गोलंदाजीला सुरुवात केलेली  नाही, पण मर्यादित षटकांच्या मालिकेत शानदार कामगिरीनंतर त्याला कसोटी संघात त्याच्या निवडीबाबत विचार होऊ शकतो, अशी आशा निर्माण झाली होती. रविवारी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर पांड्याने म्हटले होते की,‘संघव्यवस्थापनाने सांगितले तर मला ऑस्ट्रेलियात थांबण्यात कुठली अडचण नाही. त्यामुळे त्याच्या थांबण्याची आशा बळावली होती, पण दोन दिवसानंतर त्याने भारतात परतत असल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या व अंतिम टी-२० आंतरारष्ट्रीय सामन्यानंतर बोलताना पांड्या म्हणाला,‘ मला वाटते की मायदेशी परतायला हवे. आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवायला हवा. मी चार महिन्यांपासून आपल्या बाळाला बघितले नाही. त्यामुळे मी कुटुंबासोबत वेळ घालविण्यास इच्छुक आहो.’

हार्दीकचा नवा रेकॉर्ड

शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी संयमी खेळ करताना टीम इंडियाची खिंड लढवली. हार्दिकनं ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना एका विक्रमाला गवसणी घातली. त्यानं केदार जाधवचा विक्रम मोडला.  त्यानं वन डे क्रिकेटमध्ये १००० धावांचा पल्लाही पार केला. धवनसह त्यानं पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. हार्दिकनं भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावांचा विक्रम नावावर केला. हार्दिकनं ८५७ चेंडूंत १००० धावा केल्या. यापूर्वी हा विक्रम केदार जाधवच्या ( ९३७ चेंडू) नावावर होता. 

टॅग्स :हार्दिक पांड्यामुंबईमराठीमुंबई इंडियन्स