Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ - अकरावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळणारच

By admin | Updated: July 21, 2016 12:02 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा अकरावीची प्रवेश प्रकिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचे आदेश आहेत.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २१ - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा अकरावीची प्रवेश प्रकिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचे आदेश आहेत. अकरावीसाठी रिक्त जागांची संख्या ५० हजाराहून अधिक आहे. याउलट प्रवेशांसाठी शिल्लक विद्यार्थी संख्या १० हजाराहून कमी आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश कसा द्यायचे ते दोन ते तीन दिवसात निर्णय घेतला जाईल असे शिक्षण उपसंचालकांनी गुरुवारी सांगितले. 
 
प्रवेशाच्या चार गुणवत्ता याद्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. काही विद्यार्थ्यांनी चुकीचे फॉर्म भरल्यामुळे ते प्रवेश प्रक्रियेबाहेर गेले होते. काही विद्यार्थ्यांनी नाव यादीत आल्यानंतरही प्रवेश घेतला नाही. 
 
अकरावीला प्रवेश न मिळालेले शेकडो विद्यार्थी-पालक शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाबाहेर गर्दी करत आहेत. या विद्यार्थी-पालकांना आज शिक्षण उपसंचालकांनी एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित रहाणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल असे आश्वासन दिले.