Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवाकर रावते यांच्यावर विदर्भाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:44 IST

शिवसेनेचे विविध विभागांच्या जबाबदाºया आता पक्षातील मंत्री व नेत्यांना देण्यात आल्या आहेत.

मुंबई : शिवसेनेचे विविध विभागांच्या जबाबदा-या आता पक्षातील मंत्री व नेत्यांना देण्यात आल्या आहेत. विदर्भाची जबाबदारी परिवहनमंत्री दिवाकर रावते, उत्तर महाराष्ट्राची व पुण्याची जबाबदारी खा. संजय राऊत यांच्याकडे तर मराठवाड्याची जबाबदारी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना दिली आहे. तसेच सातारा, सांगली, कोलापूरची जबाबदारी गजानन किर्तीकर यांना देण्यात आली असून कोकणाचे काम उद्योगमंत्री सुभाष देसाई पाहतील. या सगळ्यांसोबत येथील खासदार, आमदार असतील.