Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीडिता आठवडाभर मार्वे येथील झुडपात

By admin | Updated: November 6, 2016 04:02 IST

सतरा वर्षांच्या गतिमंद युवतीची फूस लावून अपहरण केल्यानंतर, नराधमांनी मार्वेतील झुडपात आठवडाभर ठेवून त्या ठिकाणी अत्याचार केला असल्याचे तपासातून पुढे येत आहे.

मुंबई : सतरा वर्षांच्या गतिमंद युवतीची फूस लावून अपहरण केल्यानंतर, नराधमांनी मार्वेतील झुडपात आठवडाभर ठेवून त्या ठिकाणी अत्याचार केला असल्याचे तपासातून पुढे येत आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी तरुणीच्या दोघा मावस भावांसह पाच जणांना अटक केली असून, त्यांच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. मालाड पूर्वच्या चिंचोली फाटक परिसरात राहणाऱ्या गतिमंद तरुणीचे परिसरातील पाच जणांनी २१ आॅक्टोबरला आपल्यासोबत नेले होते. तिला हवे ते खायला दिल्यानंतर, ती सोबत येण्यास तयार होत असे, अशी कबुली एका आरोपीने दिली. २१ आॅक्टोबरला सोबत घेऊन गेल्यानंतर, त्यांनी मार्वेतील झुडपात नेऊन बलात्कार केला. त्यानंतर, तिला याचा परिसरात ठेवून तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करीत होते, कोणत्याही कॉटेजमध्ये ठेवण्यात आले नव्हते, असे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पीडिता अकरा आठवड्यांची गर्भवती असल्याने, तिच्यावर २१ आॅक्टोबरपूर्वीही अत्याचार करण्यात आला आहेत. अटक आरोपीशिवाय अन्य काही जणांचाही त्यामध्ये सहभाग असल्याची शक्यता आहे, त्याबाबत चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पीडितेवर अत्याचार करण्यात आलेल्या घटनास्थळाची फोरेन्सिक पथकाने भेट देऊन पाहणी केली. पीडितेला मार्वे परिसरात असलेल्या सर्व कॉटेज आणि लॉज दाखविण्यात आल्यानंतर, तिने झाडाझुडपाकडे नेल्याचे बोटाने इशारा करून सांगितले. त्या ठिकाणाचे नमुने तपासासाठी घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी) - मालाड पूर्वच्या चिंचोली फाटक परिसरात राहणाऱ्या गतिमंद तरुणीचे परिसरातील पाच जणांनी २१ आॅक्टोबरला आपल्यासोबत नेले होते. तिला हवे ते खायला दिल्यानंतर, ती सोबत येण्यास तयार होत असे, अशी कबुली एका आरोपीने दिली. तिला सोबत घेऊन गेल्यानंतर, त्यांनी मार्वेतील झुडपात नेऊन बलात्कार केला होता.