Join us

श्रीरंग सोसायटीच्या राजकारणात चिमुरडीचा बळी

By admin | Updated: July 5, 2015 03:50 IST

आपल्याच मदतीने सीसीटीव्ही बसवण्याचा हट्ट करीत पदाधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकल्याने श्रीरंग सोसायटीतील सीसीटीव्ही गेल्या चार महिन्यांपासून धूळखात असल्याची धक्कादायक

सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबईआपल्याच मदतीने सीसीटीव्ही बसवण्याचा हट्ट करीत पदाधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकल्याने श्रीरंग सोसायटीतील सीसीटीव्ही गेल्या चार महिन्यांपासून धूळखात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जर सीसीटीव्ही कार्यन्वित असते तर कदाचित २९ जूनला हरवलेल्या फ्रेन्शिलाचा वेळीच शोध घेऊन तिचा जीव वाचवता आला असता. सोसायटीतील राजकीय वादात चिमुकलीचा हकनाक बळी गेल्याची हळहळ स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.सोसायटीच्या गेटसमोरूनच फ्रेन्शिलाचे तिच्या काकाने अपहरण केले होते. यावेळी सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे असते तर तिला पळवणारा क्लेअरन्स कॅमे-यात कैद झाला असता. फुटेजच्या आधारे पोलिसांना क्लेअरन्सच्या तावडीतून वेळीच फ्रेन्शिलाची सुटका करता आली असती. परंतु सीसीटीव्ही फुटेजअभावी पोलिसांना अपहरणकर्त्यापर्यंत पोचण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला. तपासात ऐरोली टोलनाक्यावरील सीसीटीव्हीतील फुटेज महत्त्वाची ठरली. जर सोसायटीत कॅमेरे असते तर अपहरणाचा उलगडा झाला असता आणि तिलाही वाचवता आले असते, असे मतही पोलिसांनी व्यक्त केले आहे. परंतु दुर्दैवी बाब म्हणजे सोसायटीत सीसीटीव्ही बसवण्यासाठी मिळालेले कॅमेरे गेल्या चार महिन्यांपासून कार्यालयातच वापराविना पडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीसीटयानुसार काहीच दिवसात त्यांना याकरिता सव्वा लाखांची आर्थिक मदत केल्याचे मढवी यांनी सांगितले. आपणच कॅमेरे बसवून देतो असा प्रस्ताव मांडला होता. मात्र पदाधिका-यांनी रकमेची मागणी केलेली असेही ते म्हणाले. त्यानंतर घटनेच्या दिवशी फ्रेन्शिलाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही तपासा, असे आपण पदाधिकाऱ्यांना सांगितले असता, तिथे कॅमरेच बसवले नसल्याची बाब समोर आल्याचे मढवी यांनी सांगितले. ५० हजार रुपयांचे काही कॅमेरे आणून देखील ते वापराविना सोसायटी कार्यालयात ठेवलेले आढळल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सोसायटीला सीसीटीव्हीसाठी आर्थिक सहकार्य केलेल्या राजेश मढवी यांची साक्ष घेऊन संबंधितांचीही चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली आहे.राजकीय दबावाने काम थांबले : मिळालेल्या निधीनुसार सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवातही झालेली. परंतु ही बाब समजताच एका राजकीय व्यक्तीने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकून हे काम थांबवले व आपल्याच मदतीने सोसायटीत कॅमेरे बसवा, असे सांगितल्याचे समजते. मात्र त्यानंतर या राजकीय व्यक्तीने अथवा सोसायटीने त्याचे गांभीर्य न घेतल्याने गेल्या चार महिन्यांपासून सोसायटीत कॅमेरे लागलेच नाहीत. जर सोसायटीच्या सुरक्षेबाबत राजकारण झाले नसते तर फ्रेन्शिलाचा निष्पाप बळी गेला नसता.