Join us  

विद्यापीठात उपराष्ट्रपती नायडूंचे व्याख्यान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 4:00 AM

मुंबई विद्यापीठामध्ये लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या व्याख्यानामध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे संबोधित करणार आहेत.

मुंबई  - मुंबई विद्यापीठामध्ये लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या व्याख्यानामध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे संबोधित करणार आहेत. सहकार क्षेत्रामध्ये लक्ष्मणराव इनामदार यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या आठवणींना आणि आदर्शांना उजाळा देण्यासाठी मुंबई विद्यापीठामध्ये व्याख्यान आयोजित केले गेले आहे. मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक दीक्षान्त सभागृहात १५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. उदय जोशीदेखील उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :मुंबईमुंबई विद्यापीठ