Join us  

मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे ज्येष्ठ नागरिकांचे बचावले प्राण! मुलुंड स्थानकातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 4:07 PM

मोटारमनने प्रसंगावधान दाखवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचे प्राण बचावले आहे. बुधवारी दुपारी ही घटना मुलुंड स्थानकात घडली. डोंबिवली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघालेली धीमी लोकल दुपारी २.३६ मिनिटांनी मुलुंड स्थानकात पोहचली.  

- महेश चेमटे

मुंबई : मोटारमनने प्रसंगावधान दाखवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचे प्राण बचावले आहे. बुधवारी दुपारी ही घटना मुलुंड स्थानकात घडली. डोंबिवली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघालेली धीमी लोकल दुपारी २.३६ मिनिटांनी मुलुंड स्थानकात पोहचली.  यावेळी ६० ते वर्षाचा प्रवासी रेल्वे रुळावर आलेला पाहताच मोटारमनने प्रसंगावधान राखत लोकल थांबवली.

 हा प्रवासी दिंडोशी येथे राहणारा असून तो एम.एस. चव्हाण असे नाव सांगत आहे. मोटारमनने प्रसंगावधान राखत त्या प्रवाशांचे प्राण वाचवले. या प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सदर प्रवाशाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्या प्रवाशाला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या मेन मार्गावरील सेवेवर कोणताच परिणाम झाला नाही. मोटारमनचे प्रसंगावधान आणि रेल्वे पोलिसांची तत्परता यामुळे ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचले.

टॅग्स :मुंबई लोकल