Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ अभिनेते मोहन भंडारी यांचे निधन

By admin | Updated: September 26, 2015 03:11 IST

छोट्या पडद्यावरील मालिकांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन भंडारी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले.

मुंबई : छोट्या पडद्यावरील मालिकांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन भंडारी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते ब्रेन ट्युमरच्या आजाराने त्रस्त होते. दूरदर्शनवरील ‘खानदान’ या प्रसिद्ध मालिकेव्यतिरिक्त त्यांनी कर्ज, परंपरा, जीवन मृत्यू, पतझड, गुमराह या मालिकांमध्ये काम केले होते. आमिर खान याच्या ‘मंगल पांडे - द रायझिंग स्टार’ या चित्रपटातही त्यांनी काम केले होते. ऐंशीच्या दशकात त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले होते. १९९४ साली मात्र ते छोट्या पडद्यावरील मालिकांपासून दूरावले. ‘सात फेरे’ या मालिकेतून त्यांनी पुनरागमन केले होते. (प्रतिनिधी)