Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पुन्हा एकदा मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पुन्हा एकदा मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यांना अतिदक्षता विभागात निगराणीखाली ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दिलीप कुमार यांना दहा दिवसांपूर्वी फुप्फुसात पाणी झाल्याच्या त्रासानंतर मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले हाेते. सुमारे दहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.

‘दिलीप साहेब यांना खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. डॉ. नितीन गोखले यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. साहेबांसाठी प्रार्थना करा’, असे ट्विट त्यांच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे. तर, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत. काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

यापूर्वी ६ जून रोजी दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हाही त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. उपचारानंतर ११ जून रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला हाेता.

...................................................