Join us  

रात्री 10.30 पर्यंत वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून 14 गणपती मूर्तींचे झाले विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 1:36 AM

अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून 7 किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाडयाची  शिपील (छोट्या बोटी)च्या तराफ्यातून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून 7 किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाडयाची  शिपील (छोट्या बोटी)च्या तराफ्यातून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने लहान मूर्तीपासून ते मोठ्या गणेश मूर्तींचे येथील खोल समुद्रात विसर्जन केले जाते.रात्री 10.30 पर्यंत वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून 14 गणपती मूर्तींचे झाले विसर्जन झाले असल्याची माहिती मांडवी गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष पंकज जोनचा व सचिव विरेंद्र मासळी यांनी लोकमतशी बोलतांना केला.आज रविवार सुट्टीचा दिवस तयात भारत व पाकिस्तान यांच्यात दुबईत सुरू असलेला सामना पाहण्यात गणेश भक्त दंग असल्याने आज गणपती विसर्जनाला वेसाव्यात तशी उशिराच सुरवात झाली. यंदा विसर्जनासाठी चार शिपील चा एक तराफा तयार केला आहे.येथील विसर्जनाला असे एकूण तीन ताराफे सज्ज ठेवण्यात आले असून येथील किनाऱ्यावर आलेल्या गणेश मूर्ती व्यवस्थितपणे क्रेनने उचलून शिपीलच्या तराफ्यावर लाकडी फळीवर ठेवण्यात येत आहे.एक क्रेन महापालिकेने उपलब्ध केली असून दुसरी क्रेन मांडवी गल्ली कोळी जमातीने सज्ज ठेवली असल्याची माहिती त्यांनी दिली.

विसर्जनासाठी सज्ज असलेल्या एका ताराफ्यावर  मध्ये फळी ठेऊन गणपतीची मूर्ती ठेवली जाते.मग वेसावे येथील खोल समुद्रात लाकडी फळीवरील ठेवलेल्या गणेश मूर्तीला कोणताही धक्का न लागता फळी बाजूला करून सुखरूप विसर्जन केले जात आहे.

आजच्या या विसर्जन सोहळ्यात या जमातीचे सुमारे 300 कार्यकर्ते येथील विसर्जन सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी झटत आहेत.उद्या  दुपारी 4 वाजेपर्यंत सुमारे 24 तास येथील विसर्जन सोहळा सुरूच असतो अशी माहिती मांडवी गल्ली कोळी जमातीचे उपाध्यक्ष जगदीश भिकरू व खजिनदार नरेश कोळी यांनी सांगितले.

टॅग्स :गणेश विसर्जनगणेश चतुर्थी २०१८