Join us

मागाठाणेतील वेर्ले ग्राम विकास मंडळ शिवसेनेसोबत

By admin | Updated: October 8, 2014 01:58 IST

मागाठाणे विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या दहिसर पूर्वेकडील वेर्ले ग्राम विकास मंडळाने येत्या निवडणुकीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे

मुंबई : मागाठाणे विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या दहिसर पूर्वेकडील वेर्ले ग्राम विकास मंडळाने येत्या निवडणुकीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे प्रकाश सुर्वे रिंगणात उतरले आहेत.वेर्ले ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष एम.डी. राऊळ, सचिव एम.के. राऊळ, कार्यालय संपर्कप्रमुख विष्णू राऊळ यांनी पत्रक काढून शिवसेना व सुर्वे यांना हा जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.उमेदवारी जाहीर झाल्यापासून सुर्वे यांनी शिवसेनेची भूमिका आणि मागाठाणे मतदारसंघाबद्दलचे स्वत:चे व्हिजन घराघरात पोहोचवले आहे. पथनाट्ये, पदयात्रा, चौकसभा, जाहीर सभांनी सुर्वे आणि शिवसैनिकांनी मागाठाणे पिंजून काढला आहे. यावेळी त्यांना मतदारांचा प्रतिसादही मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर मागाठाणेत पहिली सभा घेतली होती. (प्रतिनिधी)