Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक परिषदेतून वेणूनाथ कडू अर्ज भरणार

By admin | Updated: January 9, 2017 04:46 IST

शिक्षक मतदार संघाच्या कोकण विभागातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या मतदारसंघातील

मुंबई : शिक्षक मतदार संघाच्या कोकण विभागातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या मतदारसंघातील नुकतेच निवृत्त झालेल्या आमदार रामनाथ मोते यांच्या जागी परिषदेने यंदा वेणूनाथ कडू यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोते यांच्याकडून अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आधी कोकण विभाग शिक्षक मतदार संघातून शिक्षक परिषदेतर्फे मोते विधानपरिषदेवर निवडून गेले होते. मात्र, यंदा परिषदेने कडू यांच्या नावाची घोषणा करत, सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. नवी मुंबईतील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात कडू १३ जानेवारीला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. (प्रतिनिधी)