Join us

वेंगसरकर अकादमी संघाचे शानदार विजेतेपद

By admin | Updated: December 24, 2016 03:52 IST

आयुष म्हात्रे आणि श्रेयांश मिश्रा यांच्या शानदार अर्धशतकी सलामीच्या जोरावर ओव्हल वेंगसरकर अकादमी संघाने रॉक फ्युजन

मुंबई : आयुष म्हात्रे आणि श्रेयांश मिश्रा यांच्या शानदार अर्धशतकी सलामीच्या जोरावर ओव्हल वेंगसरकर अकादमी संघाने रॉक फ्युजन ब्लू संघाचा ८ विकेट्सने पराभव करत १२ वर्षांखालील क्रिकेट चषक स्पर्धेत बाजी मारली.माहूल येथे झालेल्या या सामन्यात ब्ल्यू संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्लू संघाच्या आदित्य बालीवडेने चौफेर फटकेबाजी करत ५२ चेंडूत ५४ धावा केल्या. वेंगसरकरचा डावखुरा फिरकी गोलंदाज साई अंगारेने अवघ्या १३ धावांत ३ फलंदाजांना तंबूत धाडले. तर, रिदय खांडके याने २४ धावांत २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. ब्लू संघाने २५ षटकात ८ बाद ११९ धावांची मजल मारली.यानंतर वेंगसरकर संघाच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. फॉर्मात असलेल्या आयुष म्हात्रेने ५८ चेंडूत ४० धावा केल्या. श्रेयांश मिश्राने त्याला योग्य साथ देत ३३ चेंडूत २३ धावा केल्या. (क्रीडा प्रतिनिधी)