Join us

स्वच्छता मोहिमेला वेग

By admin | Updated: October 5, 2015 02:56 IST

‘स्वच्छ मुंबई - स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत २५ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबर या कालावधीत महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये राष्ट्रीय स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले

मुंबई : ‘स्वच्छ मुंबई - स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत २५ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबर या कालावधीत महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये राष्ट्रीय स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून, महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध विभागांमध्ये दैनंदिन स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान अंतर्गत सर्व विभाग कार्यालयांमध्ये उत्सव स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ‘बी’ विभागातील उमरखाडी व डोंगरी, कोळीवाडा आणि नागदेवी पथ, नरसीनाथा पदपथ व वाय. एम. मार्ग, बी विभाग कार्यालयापासून रामचंद्र भट मार्ग, सामंतभाई नानाजी मार्ग, एस. व्ही. पी. मार्ग, आय. आर. मार्ग व बी विभाग कार्यालयापर्यंत स्वच्छता विषयक संदेश देणारी प्रभातफेरी काढण्यात आली. तर रायचूर मार्ग, सोलापूर मार्ग, पूना मार्ग, कल्याण मार्ग, नंदलाल जैन मार्ग, लीलाधर लखमसी मार्ग येथे स्वच्छताविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.एन विभागातील रमाबाई नगर झोपडपट्टी, आझाद नगर झोपडपट्टी, कामराज नगर, भटवाडी बाबू गेनू मैदान आणि डॉ. हेडगेवार उद्यान येथील विसर्जनस्थळ, बर्वे नगर मैदान, भीमनगर झोपडपट्टी, शास्त्री नगर झोपडपट्टी येथे स्वच्छताविषयक मोहीम राबविण्यात आली, तर पंतनगर शाळा क्रमांक ३, रमाबाई वसाहत, माणिकलाल महापालिका शाळा, बर्वे नगर या विभागातील महापालिका शाळांतील विद्यार्थी महापालिका कर्मचाऱ्यांसमवेत प्रभातफेरीमध्ये सहभागी झाले होते.आझाद नगर, लक्ष्मी नगर, किरोल गावठाण झोपडपट्टी, गणेश नगर झोपडपट्टी, पारसीवाडी झोपडपट्टी, वर्षानगर झोपडपट्टी येथे स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम पार पडली. तसेच, एम/पूर्व विभाग कार्यालयातर्फे जी. एम. लिंक रोड, गायकवाड नगर, झेंडे उद्यान, वाशी जेट्टी, ट्रॉम्बे जेट्टी, आशिष तलाव, लल्लुभाई कंपाउंड इमारत क्र. ५१ ते ५८ आणि १५ ते २१, इंदिरा नगर, शिवाजी नगर, आण्णाभाऊ साठे नगर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. एच /पूर्व विभागातील गरीब नगर, मद्रासवाडी, डावरी नगर, आशानगर, डीमेला कंपाउंड, दीपक वाडी, अन्नावाडी, गेट नं. १८, डीमेला कंपाउंड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. (प्रतिनिधी)