मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच मुंबईत येणा:या टोलनाक्यांच्या दरात 1 सप्टेंबरपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि हे दर लागू होताच वाहनचालक तसेच टोलची वसुली करणा:या कर्मचा:यांमध्ये वाद सुरू झाला. पाच टोलनाक्यांवर नवीन दराची वसुली करताना येत असलेल्या अडचणींमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे वाहनचालकांनाही मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत होता.
एमएसआरडीसीकडून (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) मुंबईत येणा:या टोलनाक्यांच्या दरात पाच ते वीस रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. 1 सप्टेंबरपासून ही दरवाढ ऐरोली, वाशी, मुलुंड चेकनाका, मुलुंड जकात नाका आणि दहिसर अशा पाच टोलनाक्यांवर लागू झाली. यापूर्वी कारसाठी 30 रुपये, एलसीव्ही वाहनांसाठी 40 रुपये, बस आणि ट्रकसाठी 75 रुपये आणि एमएव्ही वाहनांसाठी 95 रुपये मोजावे लागत. कार आणि एलसीव्ही वाहनचालकांना महिन्याला 300 रुपयांचा तर बस, ट्रक चालकांना त्यापेक्षा अधिक भरुदड पडणार आहे. मात्र ही नवीन दरवाढ माहिती नसणा:या वाहनचालक आणि टोलनाक्यांवरील कर्मचा:यांमध्ये मोठा वाद होत होता. कर्मचा:यांनाही मोठय़ा समस्येला तोंड द्यावे लागत होते. आकारण्यात आलेल्या नवीन दराच्या पावत्या काही ठिकाणी कागदांवरच लिहून देण्यात येत असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. ऐरोली, वाशी, दहिसर
टोल नाक्यांवर तर सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर्पयत रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. याबाबत एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांना विचारले असता, वाहनचालकांना वाढीव दराची माहिती नसल्यामुळेच काही टोलनाक्यांवर वाद होत
होता. मात्र कर्मचा:यांकडून याची माहिती दिल्यानंतर हा वाद मिटत
होता. कुठल्याही टोलनाक्यांवर कायदा व सुव्यवस्था बिघडली
नव्हती. (प्रतिनिधी)