चेतन ननावरे - मुंबईअवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांचे भाव कडाडले असून सुमारे ५० टक्क्यांहून अधिक भाववाढ झाली आहे.नोव्हेंबर ते मार्च हा भाज्यांसाठी उत्तम हंगाम मानला जातो. या काळात नेहमीच्या मानाने पालेभाज्या आणि फळभाज्यांचे उत्पादन अधिक व दर कमी असतात. मात्र गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून आवक घटली आहे. त्यात कोबी, कांदा, बटाटा, मिरची, फरसबी अशा भाज्यांचा समावेश आहे. याउलट शहरालगत पिकणाऱ्या मेथी, पालक आणि कोथिंबिरीचे उत्पादन मात्र जैसे थे असल्याने त्यांचे भावही स्थिर असल्याची माहिती भायखळा को. आॅप. प्रिमायसेस सोसायटीचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी दिली.झोडगे म्हणाले, ‘नोव्हेंबरपासून लग्न समारंभ आणि सांस्कृतिक, क्रीडा व कला कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा सार्वजनिक कार्यक्रमांच्या या काळातच भाज्यांना मोठी मागणी असते. मात्र कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथून येणाऱ्या मालालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ठेकेदारांना मोठा फटकाहॉटेल, रुग्णालये, कॅन्टीन आणि प्रशासकीय कार्यालयांना मोठ्या प्रमाणात तरकारीचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. कारण इतर महिन्यांत होणाऱ्या नुकसानीची भरपाई ठेकेदार नोव्हेंबर ते मार्च दरम्यान होणाऱ्या मोठ्या नफ्यातून भरून काढतात. मात्र आवक घटल्याने घाऊक बाजारातच तरकारी चढ्या दराने खरेदी करावी लागत असल्याने ठेकेदारांना नुकसान सहन करावे लागत आहे.गाजराचा हलवा, नको गं बाई!थंडीच्या काळात देशी आणि दिल्लीच्या गाजरांना अधिक मागणी असते. विशेषकरून गाजराचा हलवा तयार करण्यासाठी दिल्लीच्या गाजरांचा वापर केला जातो. मात्र आवक घटल्याने गाजराच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीला येणाऱ्या महिला ग्राहक गाजराकडे पाहून नाक मुरडत असल्याचे घाऊक व्यापारी विवेक बाळसराफ यांनी सांगितले.डब्याला काय द्यायचे हा प्रश्नचपती आणि मुलांना डब्यात देण्यासाठी कोबी, फ्लॉवर आणि वाटाणा या भाज्या तयार करण्यात जास्त अडचण येत नाही. मात्र या तीनही भाज्यांचे दर वाढल्याने आता पालक आणि मेथीची भाजी द्यावी लागत आहे. त्यामुळे काम वाढले असले, तरी तब्येतीसाठी भालेभाज्या कधीही उत्तम असतात, अशी प्रतिक्रिया सविता शिंदे या गृहिणीने दिली. भाजीजुने दर वाढीव दरप्रति किलोप्रति किलोटोमॅटो१५ ३०-३५कांदा१०२०(किमान)बटाटा१०-१२२०-२५मिरची२०३६-५०काकडी१०२०-३०फरसबी२०३६-४०वाटाणा१५-२०४०-४५फ्लॉवर१०-१५२०-२५गाजर१०-१२२५कोथिंबीर (जुडी)७-८१०मेथी (जुडी)७-८१०