Join us

वीणा चिटको यांचे निधन

By admin | Updated: September 20, 2015 00:40 IST

ज्येष्ठ कवयित्री, संगीतकार व गायिका वीणा चिटको (८०) यांचे शनिवारी सकाळी चेंबूर येथील रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ‘वायुसंगे येई श्रावणा’, ‘सखी सांज उगवली’, ‘हलकेच

मुंबई : ज्येष्ठ कवयित्री, संगीतकार व गायिका वीणा चिटको (८०) यांचे शनिवारी सकाळी चेंबूर येथील रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ‘वायुसंगे येई श्रावणा’, ‘सखी सांज उगवली’, ‘हलकेच जागवावे’, ‘मन माझे भुलले’ अशी त्यांची अनेक गाणी गाजली होती. केवळ भारतातच नव्हे; तर परदेशात जाऊनही त्यांनी संगीताचे कार्यक्रम केले होते. त्यांनी सतार वादनाचेही प्रशिक्षण घेतले होते. संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या त्या कन्या होत. १९३५ मध्ये मास्टर फुलंब्रीकर ‘प्रभात’मध्ये दाखल झाले आणि त्यानंतर वीणा चिटको यांचा जन्म झाला. त्यामुळे चित्रपती व्ही. शांताराम यांनी त्यांचे नाव ‘प्रभा’ असे ठेवले होते. (प्रतिनिधी)