Join us

वसई नायगाव खाडीतील पाहुणोपक्षी गायब

By admin | Updated: September 18, 2014 23:30 IST

हंगाम सुरू होऊन बराच अवधी झाला तरी पाहुणो पक्षी वसईत दाखल न झाल्याने पक्षी निरीक्षकांचा हिरमोड झाला आहे.

नायगांव : हंगाम सुरू होऊन बराच अवधी झाला तरी पाहुणो पक्षी वसईत दाखल न झाल्याने पक्षी निरीक्षकांचा हिरमोड झाला आहे. यावर्षी नायगांव, वसई या खाडीभागात मुबलक पाणीच नसल्याने हे पक्षी अन्य ठिकाणी स्थलांतरीत झाले असण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर मध्ये वसई, नायगांव परीसरात फ्लेमिंगो येण्यास सुरूवात होते. हे पक्षी पाहण्यासाठी अनेक हौशी पर्यटक या भागात दाखल होतात. तसेच नामवंत छायाचित्रकारही या पर्वणीत सहभागी होतात. यावर्षी मात्र चित्र बदलल आहे. जलप्रदूषण, वाढती अवैध बांधकामांची अतिक्रमण यामुळे आधीच हे पक्षी या भागात दाखल होण्यास अनुत्साही असायचे त्यातच वाढत्या शिकारीची नवीच समस्या समोर येवू लागल्याने या पक्षांनी आपला मार्गच बदलल्याची शक्यता आहे. 
फ्लेमिंगो येणार कधी? याच उत्तर पक्षी निरीक्षकही देऊ शकलेले नाहीत. खाडी भागातील पाणी पूर्वी मिठागरांसाठी वापरले जायचे. त्यामुळे विविध खाडी भाग पाण्याने भरलेला असायचा. आता मिठागरांची लिझ संपल्याने अनेकांनी हा व्यवसाय बंद केला. परीणामी खार पाणी सोडणो बंद झाले. पर्यायाने या पाण्यात भक्ष शोधण्यासाठी येणारे सदर पाहुणो पक्षी आता गायब झाले आहेत. (वार्ताहर)