Join us
Daily Top 2Weekly Top 5

विक्रोळीत जेष्ठ नागरिकाचा संंशयास्पद मृत्यू

By admin | Updated: March 3, 2015 01:33 IST

विक्रोळी येथील गोदरेज कॉलनी येथे राहणाऱ्या ५७ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली.

मुंबई : विक्रोळी येथील गोदरेज कॉलनी येथे राहणाऱ्या ५७ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. येराज दारुवाला (५७) असे मृत इसमाचे नाव असून त्यांंच्या मृतदेहावरील चेहरा प्लास्टिक पिशवीने झाकण्यात आला होता. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या? याचा अधिक तपास विक्रोळी पोलीस करीत आहेत.विक्रोळी पूर्वेकडील स्टेशन रोड गोदरेज कॉलनी येथील एक्स ४४४ मधील पहिल्या मजल्यावर राहणारे दारुवाला हे कंझ्युमर सोसायटीमध्ये काम करत होते. सकाळपासून दारुवाला यांचा काहीही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांना बोलावण्यासाठी घरी आलेल्या कर्मचाऱ्यांना दरवाजा आतून बंद आढळला. बराच वेळ घराचे दार ठोठावूनही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी घराच्या खिडकीच्या ग्रील तोडून आत प्रवेश केला. दारुवाला हे तोंडाला प्लास्टिक पिशवी गुंडाळून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. याची माहिती विक्रोळी पोलिसांना लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. दारुवाला यांंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला असून त्यांंच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांंची हत्या की आत्महत्या? याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती विक्रोळी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)