वसई : पेशावरमधील एका शाळेत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात १३२ विद्यार्थ्यांसह १५० जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा देशभरातून निषेध झाला. बुधवारी रात्री वसईतील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी कँडलमार्च काढून विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.कँडलमार्चपूर्वी प्रत्येक शाळांमध्ये दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सायंकाळी एव्हरशाईन सिटी शाळेतील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला हा कँडलमार्च एव्हरशाईन सिटी येथून निघून संपूर्ण परिसरात फिरला व पुन्हा एव्हरशाईन सिटी सर्कल येथे समाप्त झाला. विद्यार्थ्यांसोबत आसपासच्या परिसरातील रहिवासीही यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी हल्लेखोरांचा निषेध करण्यात आला.
श्रद्धांजली वाहण्यासाठी वसईत कँडलमार्च
By admin | Updated: December 18, 2014 23:48 IST