Join us

वसईत बालकुमार साहित्य संमेलन

By admin | Updated: December 8, 2014 23:39 IST

येथील महापालिका आणि सहकार शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने वर्तक विद्यालयाच्या प्रांगणात 12 डिसेंबर रोजी सातवे बालकुमार मराठी साहित्य संमेलन आयोजिण्यात आले

वसई : येथील महापालिका आणि सहकार शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने वर्तक विद्यालयाच्या प्रांगणात 12 डिसेंबर रोजी सातवे बालकुमार मराठी साहित्य संमेलन आयोजिण्यात आले असून प्रसिद्ध लेखक जोसेफ तुस्कानो त्याचे उद्घाटन करणार आहेत. 
सकाळी 8 ते 1क् या काळात ग्रंथदिंडी, दुस:या सत्रत 1क् ते दुपारी 1 उद्घाटन सोहळा तसेच आम्ही असे घडलो. या कार्यक्रमांतर्गत सिनेनिर्मात्या उत्तुंग ठाकुर आणि टिव्ही स्टार स्मिता गवाणकर यांची मुलाखत कलेचे अंतरंग या विजयराज बोधनकर यांचा सहभाग दुपारी 2.3क् ते 3.3क् या तिस:या सत्रत जयंत ओक यांच्याशी गप्पा 3.35 ते 4.35 च्या चौथ्या सत्रत विद्याथ्र्याचे कवीसंमेलन 4.4क् ते 5.45 या पाचव्या सत्रत विद्याथ्र्याचे कथाकथन. 5.5क् ते 6.3क् सहाव्या सत्रत प्रकट वाचन आणि सातव्या 6.3क् ते 7.3क् या सत्रत दिलीप खन्ना यांचा हास्य दरबार असे कार्यक्रम होणार आहेत. 
विजयराज बोधनकर यांचे चित्र प्रदर्शन, डिंपल प्रकाशनाचा ग्रंथ स्टॉल हे विशेष आकर्षण आहे तर 13 तारखेला दुस:या दिवशी दुपारी 3.3क् वा. सुजाण पालक मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलन याचे आयोजन केले आहे. त्यात श्रीपाद कणोकर यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्ष जोजेफ फरोझ हे आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात बॅँडपथक, नृत्यनाटय़ अविष्कार यांचा समावेश आहे. 
सेंट ङोविअर, हायस्कूल, निर्मलमाता गल्र्स स्कूल, जि.प.मराठी शाळा नवघर व माणिकपूर, एम.के. शहा गुजराती हायस्कूल, होलि पॅरॉडाईज हायस्कूल, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल, राजीव गांधी हिंदी हायस्कूल, अलनूर इंग्लिश स्कूल, ज्ञानदीप विद्यामंदिर वालीव, आश्रम शाळा कामण, शांती गोविंद विद्यालय जूचंद्र, अभिनव प्राथमिक विद्यालय या शाळांचा या कार्यक्रमात सक्रीय सहभाग आहे.
(प्रतिनिधी)
 
 
4जोसेफ तुस्कानो, 
4विजयराज बोधनकर 
4जयंत ओक
4दिलीप खन्ना
4उत्तुंग ठाकूर
4स्मिता गवाणकर
4पु.ग. वनमाळी
4श्रीपाद कणोकर
4जोजेफ फरोझ
 
 
4बहु रुपी ग्रंथदिंडी
4भव्य उद्घाटन सोहळा
4कथा कथन
4काव्य वाचन
 
4मुलाखती
4व्याख्याने 
4ग्रंथ प्रदर्शन
4चित्र प्रदर्शन
4परिसंवाद