नायगाव : बहिणीचे प्रेमपूर्ण नाते जपणारा रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपल्याने वसई परिसरातील विविध बाजारपेठा आतापासूनच सजल्या आहेत. व्यावसायिकांनी राख्यांची दुकाने थाटली आहेत. महिला व तरुणींची अगदी आतापासूनच राख्यांसाठी गर्दी होत आहे. परदेशात राखी पाठविण्यासाठी कुरियरद्वारे आगाऊ नोंदणी सुरू आहे. त्यामुळे अगदी आतापासूनच राख्यांसाठींची दुकाने विक्रीसाठी सज्ज आहेत.
मागील काही वर्षापासून राख्यांसाठीचा ट्रेंड बदलत गेला. बाळ-गोपाळांचे काटरून्सनी हे संपूर्ण जग व्यापून गेल्याने बॅटमनपासून बालगणोशही राख्यांच्या स्वरुपात अवतरले. शोभीवंत राख्यांनी अनेकांना भुरळ घातली. रेशमी गोंडे, अमेरिकन डायमंड, बटणसीलचे दिवे अशा नाना त:हाच बाजारपेठेत आल्या आहेत. होलसेल बाजारपेठांकडे हल्ली तरूणाईची पावले जास्त वळताना दिसत आहेत. दर माफक आणि ढिगभर व्हरायटी यामुळे वसईतील आनंदनगर भागात सर्वाचा जास्त ओढा असतो. यापूर्वी इतक्या लवकर राख्यांची खरेदी होत नसे. परंतु आता हे चित्र बदलले आहे. (वार्ताहर)
राख्यांपासून गिफ्टही ऑनलाइन
4सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात बर्थ डे केकपासून सणांच्या शुभेच्छांची ग्रीटिंगकार्ड्स, व्हॉट्स अॅप, फेसबुकवरून पाठविली जात असताना हाच सण प्रत्यक्षात टिकून आहे. शेवटी भावाकडून मिळणारे गिफ्टही ऑनलाईन मिळण्याची फॅशन जास्त हिट झाली, तरी हा पवित्र धागा बांधण्यासाठी खरेदीची लगबग दरवर्षीप्रमाणो जोडून आलीच.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}