Join us

वसईत नोटरीच्या १८ जागा

By admin | Updated: December 14, 2014 23:36 IST

पालघर जिल्ह्यातील वसई-विरार शहराचा वाढता विकास लक्षात घेता शासकीय व न्यायालयीन प्रकरणात येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने येथे नव्याने १८ नोटरी नेमण्याचा निर्णय घेतला आहे़

ठाणे - पालघर जिल्ह्यातील वसई-विरार शहराचा वाढता विकास लक्षात घेता शासकीय व न्यायालयीन प्रकरणात येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने येथे नव्याने १८ नोटरी नेमण्याचा निर्णय घेतला आहे़ यासाठी शहरातील नोटरीसाठी पात्र ठरणाऱ्या वकिलांकडून राज्याच्या विधी व न्याय खात्याने अर्ज मागविले आहेत़ या अर्जांच्या प्रती विधी व न्याय खात्याच्या संबंधित कार्यालयाकडे येत्या १५ जानेवारीपर्यंत उपलब्ध असून इच्छुकांनी ते घेऊन भरून पाठवायचे आहेत़ त्यानंतर विधिवत प्रक्रिया करून पात्र वकिलांची नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचे शासनाचे विधी सल्लागार एस़डी़ दरणे यांनी याबाबतच्या पत्रात म्हटले आहे़ (खास प्रतिनिधी)