वसई : यंगस्टार्स ट्रस्टतर्फे जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या संगीत महोत्सवाला शनिवारी जुने विवा महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये सुरूवात झाली. या महोत्सवात ७५ कलाकार विविध प्रकारची वाद्ये सलग २८ तास वाजवणार आहेत. या कार्यक्रमाला वसई विरारकर नागरीकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.दरवर्षी यंगस्टार्स ट्रस्टतर्फे २१ जुन रोजी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त संगीताचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदा विविध प्रकारची वाद्ये सलग शनिवारी दुपारी ३ वा. या कार्यक्रमास सुरूवात झाली. सलग २८ तास चालणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्या रवि. २१ जुन रोजी रात्री १० वा. समारोप होणार आहे. शनिवारी या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी वसई विरार भागातील संगीतप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे नागरिकांनीही उत्साहात स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)
वसईत सलग २८ तास संगीत महोत्सव
By admin | Updated: June 20, 2015 22:39 IST