Join us

वसई विरार मनपाची निवडणूक १४ जूनला होणार

By admin | Updated: May 16, 2015 22:58 IST

याचिकेवर निर्णय दिल्यानंतर शनिवारी निवडणूक आयोगाने महानगरपालिकेच्या निवडणुका १४ जून रोजी घेण्याचे जाहीर केले आहे.

वसई : मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय दिल्यानंतर शनिवारी निवडणूक आयोगाने महानगरपालिकेच्या निवडणुका १४ जून रोजी घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मनपाच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आता संपुष्ठात आली असून ११५ जागांसाठी निवडणूक होणार असून राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास स्थगिती दिली होती. यासंदर्भात निर्णय देताना दोन गावांचा मनपातील समावेश व प्रभाग क्र. ७९ च्या प्रभाग रचनेलाही मंजुरी दिली आहे. उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर निवडणूक आयोगाने वसई विरार शहर महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमानंतर राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. अनेकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे साकडे घालणे सुरु केले.४आयोगाच्या निर्णयानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. १४ जून रोजी महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी निवडणूक होणार आहेत.४ २२ मेपासून उमेदवारी अर्ज स्विकारण्यास सुरूवात होईल तर, १६ जून रोजी मतमोजणी होणार आहे. ४१४ला सकाळी ७.३० ते ५.३० दरम्यान मतदान होईल. यासाठी प्रशासकीय तयारी सुरु झाली आहे.४बहुजन विकास आघाडी, सेना-भाजप युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, जनआंदोलन समिती व जनतादल (धर्मनिरपेक्ष) असे ७ पक्ष या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहेत.४सेना व भाजपामध्ये सध्या जोरदार संघर्ष सुरू असल्याने या निवडणुकीमध्ये त्यांची युती होईल की, नाही याबाबत सर्वत्र साशंकता आहे.४महिला आरक्षणामुळे अनेक राजकीय नेत्यांचे भवितव्य अंधारात आहे. काही नगरसेवकांनी आजुबाजूच्या प्रभागात आपले नशिब आजमविण्याचा प्रयत्न सुरू केला आहेत. तर काहींनी आपल्या पत्नीलाच उमेदवारी मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठींना साकडे घालणे सुरु केले आहे. असा असेल निवडणूक कार्यक्रमनामनिर्देशन पत्रे देणे व स्वीकारणे २२ ते २९ मे २०१५अर्जाची छाननी - ३० मेअर्ज मागे घेणे - १ जूनचिन्हाचे वाटप - २ जूनकेंद्रनिहाय मतदारयादीचीप्रसिद्धी - २ जूनमतदान - १४ जूनमतमोजणी १६ जून१काँग्रेस व राष्ट्रवादीकाँग्रेस यादोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुका लढविण्याचे सुतोवाच केले आहे. परंतु या दोन्ही पक्षाला या निवडणुकींसाठी उमेदवार मिळणे कठिण आहे. त्यामुळे राज्यस्तरीय नेते बहुजन विकास आघाडीकडून ज्या काही ४-५ जागा मिळतील त्यावर समाधान मानायचे अशा निर्णयाप्रत आले आहेत.२गेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने काही जागा सोडल्यामुळे त्यांचे २ उमेदवार निवडून येऊ शकले. परंतु या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते आमदार हितेंद्र ठाकूर, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी सध्यातरी जवळीक नको,अशा मनस्थितीत आहेत. ३आमदार ठाकूर यांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध असले तरी, स्थानिक पातळीवरील भाजप नेते व कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे वरिष्ठपातळीवरील झालेला निर्णय त्यांना मान्य होणार नाही. तर आमदार ठाकूरही भाजपसाठी जागा सोडतील, अशी शक्यताही नाही. त्यामुळे पक्षांची धावपळ सुरु आहे.