वसई : डबघाईला आलेल्या सहारा समूहाच्या मालकीचा वसई पूर्व येथील 285 एकरांचा भूखंड नालासोपा:यातील रायडन रिअॅलिटर्सने एक हजार 111 कोटींना खरेदी केल्यामुळे येथील बांधकाम उद्योगात मोठी तेजी निर्माण होऊन घरांच्या किमती घसरण्याची शक्यता आहे.
हा भूखंड रेल्वे स्टेशनपासून दीड किलोमीटर अंतरावर असून त्याचे क्षेत्र गोखिवरे आणि राजिवली या दोन गावांच्या मध्ये आहे. सहाराने हा भूखंड मोठी टाऊनशिप विकसित करण्यासाठी अनेक वर्षापूर्वी घेतला होता. परंतु, इतर मोठय़ा शहरांतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्याच्या नादात हा प्रकल्प मागे पडत गेला आणि आता तर सहारा समूहाला आपले सूत्रधार सुब्रतो रॉय यांना तिहार तुरुंगातून सोडविण्यासाठी 1क् हजार कोटींचा जामीन साकार करण्याची धावपळ करावी लागते आहे. यापैकी पाच हजार कोटी बँक गॅरंटीच्या स्वरूपात असून उरलेले पाच हजार कोटी उभे करण्यासाठी या भूखंडाची विक्री सहाराने केली आहे. सध्या हा भूखंड हरित वापरासाठी असून त्याच्या विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला की, त्याच्या वापराचा उद्देश बदलण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू केली जाईल, असे त्याची खरेदी करणा:या नालासोपारा येथील रायडन रिअॅलिटर्सचे प्रतिनिधी करूळकर यांनी स्पष्ट केले आहे. सहाराच्या प्रतिनिधीने या व्यवहाराला दुजोरा दिला असून सारे काही न्यायालयाच्या संमतीने सुरू आहे, असे म्हटले आहे. सहाराने आतार्पयत गेल्या काही महिन्यांत लंडन आणि न्यूयॉर्कमधील हॉटेल्स विकली असून त्यानुसारच या भूखंडाची विक्री केली आहे.
सहाराचा वरसोवा येथे 1क्6 एकरांचा भूखंड असून त्याचे मूल्य 19,3क्क् कोटी इतके आहे. त्याचीही विक्री करण्याचा प्रयत्न सहारा समूह करीत होता. परंतु, तो सीआरङोड कक्षेत येत असल्यामुळे व त्याचा बराचसा भाग तिवर आणि खाडी, दलदल यात असल्यामुळे तो विकता येणार नाही आणि तो विकायचा प्रयत्न केला तरी त्याला फारसे ग्राहक मिळणार नाहीत. मिळाले तरी अपेक्षित किंमत येणार नाही, हे लक्षात घेऊन सहराने शेवटी वसईमधला हा भूखंड विकण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे प्रख्यात हिरे व्यापारी भरत शहा यांच्या मालकीची प्राइम डाऊन टाऊन इस्टेट ही कंपनीही या भूखंडाच्या खरेदीमध्ये भागीदार आहे. (प्रतिनिधी)