वसई : सहकार क्षेत्रमध्ये अग्रेसर असलेल्या वसई विकास सहकारी बँकेच्या मुख्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन वसईचे आ. हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते रविवार, 3क् नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुकुंदराव अभ्यंकर व प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा उपस्थित राहणार आहेत.
4 ऑक्टोबर 1984 रोजी स्थापन झालेल्या बँकेने अवघ्या 3क् वर्षात सहकार क्षेत्रत उत्तुंग भरारी घेतली. पहिल्या वर्षी 1 कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण करणा:या या बँकेच्या 31 मार्च 2क्14 रोजी ठेवी 34.36 कोटींवर गेल्या आहेत. सभासदांना दज्रेदार तसेच गतिमान सेवा देण्याकरिता बँक व्यवस्थापनाने गेल्या 3क् वर्षात आधुनिक तंत्रप्रणालीचा स्वीकार केला. आपल्या 3क् वर्षाच्या कार्यकालात आदर्श बँक, पहिल्या क्रमांकाची उत्कृष्ट बँक, सवरेत्कृष्ट नागरी सहकारी बँक, सवरेत्कृष्ट सहकारी बँक, बेस्ट ब्रँच व बेस्ट डाटा सिक्युरिटी इनिशिएटीव्ह पुरस्कार प्राप्त केले. बँकेच्या भरभराटीमध्ये सर्व आजी-माजी संचालक, कर्मचारी व विविध लोकप्रतिनिधींचे योगदान आहे. 3क् वर्षाच्या वाटचालीनंतर बँकेच्या मुख्यालयाचे आता स्वत:च्या मालकीच्या वास्तूमध्ये स्थलांतर होत आहे.
या प्रसंगी खा. आनंद अडसूळ, खा. चिंतामण वनगा, आ. क्षितिज ठाकूर, आ. विलास तरे, महापौर नारायण मानकर व माजी खा. बळीराम जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)