Join us

वसई विसर्जनासाठी सिद्ध

By admin | Updated: September 8, 2014 00:24 IST

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषणांनी जव्हार शहरात विर्सजनाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे

जव्हार : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषणांनी जव्हार शहरात विर्सजनाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. जव्हार शहरात व परिसरात सार्वजनिक व घरगुती गणेशाच्या मुर्ती जवळ जवळ ७०० ते ७५० असतात. त्यात दहा दिवसांचे गणपती विर्सजनासाठी सार्वजनीक ८० तर घरगूती १०० ते १२५ गणपती विर्सजन होणार आहेत अशी माहिती जव्हारचे पोलीस निरीक्षक यांनी दिली. विविध मंडळाचे सार्वजनिक गणेशाचे विर्सजन असते, या विर्सजनात खेडोपाड्यातून व इतर ठिकाणाहून मोठ्या संख्येने भावीक शामील होतात. ढोल, ताशा, डि.जे. च्या तालात नाचत वाजत गाजत संपुर्ण जव्हार शहरात फेरी मारून श्रीगणेशाच्या घोषणा देत भव्य मिरवणूक काढली जाते. सर्वात मानाचे गणपती म्हणजे श्रीराम मंदीराचे सार्वजनिक गणपती या गणपती विर्सजनात मोठ मोठे कार्यक्रम आयोजित करून चक्क १० दिवस विविध कार्याक्रमाचे आयोजन करतात. मिरवणूक ही श्रीराम मंदीरापासुन सुरू होऊन थेट सुर्यतलाव येथे विर्सजनाच्या ठिकाणी थांबते, या मिरवणूकी भावीकांचा जल्लोशच जल्लोश असतो. मोठ्या संख्येने भावीक शामिल होतात. त्याकरीता पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. ठिकठिकाणी चौकात पोलिसांचा ताफा लावण्यात आलेला आहे. गणपती स्थापनेपासून तर विर्सजनापर्यत कडेकोट बंदोबस्तात पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. १० दिवसाच्या विर्सजनासाठी २ पोलीस अधिकारी, ३५ कर्मचारी व १५ होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पोलीसांनी सांगितले.